Saturday, June 4, 2011

२६/११च्या आक्रमणातील एक प्रमुख सूत्रधार इलियास काश्मिरी ठार

इस्लामाबाद, ४ जून - २६/११ ला मुंबईवर झालेल्या पाकपुरस्कृत आतंकवादी आक्रमणातील एक प्रमुख सूत्रधार आणि पाकच्या नौदल तळावर अलीकडेच अतिरेक्यांनी केलेल्या आक्रमणाचा प्रमुख अन् 'अल कैदा'शी
संबंधित कुख्यात आतंकवादी इलियास काश्मिरी हा अमेरिकेच्या ड्रोण आक्रमणात ठार झाल्याचे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे; मात्र याला पाक शासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या आक्रमणात मेलेल्या ९ अतिरेक्यांमध्ये काश्मिरीचाही समावेश आहे. (जे काम भारताने करायला हवे, ते आज अमेरिकाकरत आहे. याउलट भारतीय राज्यकर्ते मात्र पाकच्या आतंकवादी कारवायाच्या विरोधात कागदी घोडेच नाचवत आहेत. अशा निष्क्रीय राज्यकर्त्यांकडून आतंकवादाचे समूळ उच्चाटन होण्याची अपेक्षा काय करणार ? ही स्थिती पालटण्यासाठी अमेरिकेतील राज्यकर्त्यांसारखे � [...]



Thanks, Admin,

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...